विधिसेवा समितीच्यावतीने ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी )- विधिसेवा समितीच्यावतीने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ येथे सहाय्यक विधी समांतर सौ. स्वाती भोळे यांच्या समन्वयाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अलका ढाके होत्या.

अध्यक्षांच्या हस्ते ॲड. निलेश भंडारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रामनाम जयघोष सोमाडेळे दादांनी केले तसेच अशोक निकम यांनी गोंदलेकर महाराजांच्या पोथीचे वाचन केले. प्रसंगी सहाय्यक विधी समांतर (पॅरा लीगल व्हॉलंटिअर ) म्हणजे काय, याची माहिती उपस्थितांना दिली तर ॲड. निलेश भंडारी यांनी ‘सामाजिक न्याय’ (दि. २० फेब्रुवारी) तसेच ‘पालक व ज्येष्ठ नागरिक भरणपोषण आणि कल्याण अधिनियम २००७’ या विषयांवर ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक व सविस्तर उत्तरे देत शंका निरसन केले. तसेच कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास PLV रुपाली नेवे यांनी उपस्थित राहून कायदेशीर पत्रकांचे वाटप करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पसायदामाने कार्यक्रमाची सांगता केली. संघाचे इंगळे दादा यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांना दाबेली व चहाचा अल्पोपहार देण्यात आला. अशा प्रकारे माहितीपूर्ण व उपयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.