मुंबई – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या होळी विशेष, विशेष आणि उन्हाळी विशेष म्हणून टप्प्याटप्प्याने चालवण्यात येणार आहेत. रेल्वेकडून एकूण १४४८ विशेष सेवा चालवण्यात येणार असून त्यामध्ये ३२८ होळी विशेष, १४८ विशेष आणि ९७२ उन्हाळी विशेष सेवांचा समावेश आहे.
साप्ताहिक विशेष गाड्या
- 01435 सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई
३१ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष, १४ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष आणि १४ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष म्हणून धावणार. (२० सेवा) - 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – सोलापूर
१ एप्रिल २०२६ पर्यंत होळी विशेष, १५ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष आणि १५ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष. (२० सेवा) - 01477 सोलापूर – अनकापल्ले
२७ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष, १० एप्रिल २०२६ पर्यंत विशेष आणि १० जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष. (१९ सेवा) - 01478 अनकापल्ले – सोलापूर
२८ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष, ११ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष आणि ११ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष. (१९ सेवा)
दैनिक विशेष गाड्या (१५ जुलै २०२६ पर्यंत)
१ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान होळी विशेष, १ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष आणि १५ एप्रिल ते १५ जुलै २०२६ दरम्यान उन्हाळी विशेष म्हणून पुढील गाड्या धावतील:

- 01461 / 01462 सोलापूर – दौंड (१३७ सेवा)
- 01465 / 01466 सोलापूर – कलबुर्गी (१३७ सेवा)
- 01487 / 01488 हडपसर – हरंगुल (१३७ सेवा)
- 01023 / 01024 पुणे – कोल्हापूर (१३७ सेवा)
- 01211 बडनेरा – नाशिक (१३७ सेवा)
आरक्षण व इतर माहिती
या विशेष गाड्यांसाठी (०१४७८ वगळता) आरक्षण १६ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध असतील. प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रकासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा NTES अॅपला भेट द्यावी.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या गाड्यांचे मार्ग, वेळा, थांबे आणि संरचना पूर्ववत राहतील. होळी व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


