अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन : स्पर्धेचे यंदा नववे वर्ष

भुसावळ (प्रतिनिधी ) –

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विदयार्थी यांच्यासाठी जळगाव जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे १९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे ९ वे वर्ष आहे.

वकृत्व स्पर्धा ५ गटात होणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येइल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

विषय आणि गट पुढील प्रमाणे असतील – गट क्रमांक १ ( इयत्ता १ली व २री) वेळ २ मिनिट अ) छत्रपती शिवाजी महाराज, गट क्रमांक २ ( इयत्ता ३री व ४थी) वेळ ३ मिनिट अ) छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण ब) छत्रपती शिवाजी महाराज यांची गुणवैशिष्ट्ये, गट क्रमांक ३ (इयत्ता ५वी ते ७वी) वेळ ४ मिनिट, अ) गड किल्ले-शिवशाहीचे सामर्थ्य, ब) छत्रपती शिवाजी महाराज- स्वराज्याचा सूर्योदय, गट क्रमांक ४ (इयत्ता ८वी ते १०वी)वेळ ५ मिनिट, अ) छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय ब) शिवशाहीतील लोकशाही तत्व, गट क्रमांक ५ (खुलागट)वेळ ७ मिनिट, अ) छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी क्षेत्रातील कार्य, ब) जाणता राजा- छत्रपती शिवाजी महाराज

स्पर्धा गुरवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल, नहाटा कॉलेज शेजारी, जामनेर रोड येथे होणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहिती साठी प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे – ९८५०१४५३९९, प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन- ९४२३४७६८३७, सह समन्वयक विक्रांत चौधरी ७५८८८१५३३७५ यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेमध्ये नावनोंदणीची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. स्पर्धेच्या दोन फेऱ्या असतील. प्रथम फेरी झाल्यानंतर त्यातून प्रत्येक गटातून १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ १ मार्च रोजी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल, येथे घेतला जाणार आहे. यावेळी निवड झालेल्या स्पर्धकाला पुन्हा तोच विषय सादर करावा लागेल. त्यातून अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.

उपक्रम समिती मध्ये डॉ. संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, डॉ. संजू भटकर, ज्ञानेश्वर घुले, प्रसन्ना बोरोले, अमितकुमार पाटील, समाधान जाधव, भूषण झोपे, अमित चौधरी, डॉ.प्रा.श्यामकुमार दुसाने, चंद्रकांत सूर्यवंशी, हितेंद्र नेमाडे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, कपिल धांडे, शिरीष कोल्हे, केतन महाजन, उमेश फिरके, मंगेश भावे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, योगेश साळुंके, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश आहे.