भुसावळ येथे आज गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑल इंडिया एस.सी., एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता, कृष्णचंद्र सभागृह, रेल्वे स्टेशनजवळ, भुसावळ येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुधीर कांबळे (मुंबई) – संस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे असतील.

कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख उपस्थितींमध्ये डॉ. निता नरके (कोल्हापूर), नगराध्यक्षा गायत्री भंगाळे (भुसावळ), रजनी सावकारे (राष्ट्रीय अध्यक्षा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन) तसेच विनोद सोनवणे यांचा समावेश आहे.

हा सोहळा राष्ट्रीय महामंत्री वंदना अनंत सोनवणे, राज्य अध्यक्षा वंदना आराक, जिल्हा निरीक्षक राजेश्री सोनवणे, जिल्हा अध्यक्षा सुनंदा मोरे व तालुका अध्यक्षा शर्मिला तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे (नॅशनल व्हाईस मीडिया फोरम जिल्हाध्यक्ष), देवदत्त मकासरे (मेजर, रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष), सुधीर पी. जंजाळे (झोनल अध्यक्ष – एस.सी./एस.टी. असोसिएशन), वाल्मिक देहाडे (मंडळ अध्यक्ष – एस.सी./एस.टी. असोसिएशन) व आर. सी. राव (मंडळ सचिव) उपस्थित राहणार आहेत.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंदना अनंत सोनवणे, वंदना आराक, राजश्री सोनवणे तसेच आंबेडकर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व आयोजकांनी केले आहे.