नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, प्रमुख वक्ते म्हणून रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. उमेश फेगडे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. उमेश फेगडे यांनी “साहित्य आढावा आणि प्रकल्प लेखन” या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले कि संशोधन प्रकल्प किंवा व्यावसायिक अहवालात ‘साहित्य पुनरावलोकन’ (Literature Review) आणि एक उत्तम ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ (Project Report) तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले आणि आभार डॉ. प्रा. व्ही एन महिरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ विद्या पाटील, प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. डॉ. एस. डी. येवले, प्रा. डॉ. सचिन कोलते, प्रा. डॉ. नीलिमा पाटील, प्रा. डॉ. पूनम महाजन, प्रा. डॉ. संगीता भिरूड, प्रा. डॉ. अजय क्षिरसागर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.