भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी भुसावळ येथील सौ. प्रियांका किरण चौधरी यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

प्रदेश तेली समाज महासंघाचे नाशिक विभागीय युवक अध्यक्ष तथा शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर यांचेसह , महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मला चौधरी , महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासंघ जळगाव शहर अध्यक्ष मनीषा चौधरी उपाध्यक्ष डॉक्टर सुषमा चौधरी यांच्या उपस्थितीत सौ. प्रियांका चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि महिलांच्या प्रश्नांबाबत असलेली सक्रिय भूमिका लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या निवडीबद्दल जय संताजी महिला मंडळाच्या सल्लागार डॉ. वृषाली चौधरी, सचिव उज्वला बागुल यांच्यासह तेली समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांकडून सौ. प्रियांका चौधरी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात तेली समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



