भुसावळ ( प्रतिनिधी )
समाजरत्न पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यात सक्रिय तसेच पत्रकारितेतील विविध संघटनांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनिता राजेंद्र महाडिक यांची व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग, जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनिता महाडिक या Live नवं विचार News च्या मुख्य संपादक असून त्या आयडियल पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ चाळीसगाव तालुका संघटक, महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना सदस्य, ठाणे जिल्हा पत्रकार संघ सदस्य, दैनिक अहिल्याराज पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडिया चाळीसगाव सदस्य, जिजाऊ ब्रिगेड सदस्य तसेच हिरकणी महिला मंडळाच्या सदस्य आहेत.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर, दिव्या भोसले मॅडम, प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी यांच्यासह राज्य कार्यकारिणी , जळगाव जिल्हा कार्यकारिणी , तालुका महिला विंग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीमुळे महिला पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होऊन महिला सशक्तीकरणाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


