भुसावळ (प्रतिनिधी)- आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी विधी सेवा प्राधिकरण, तालुका भुसावळ कोर्ट यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डि. एल. हिंदी शाळा, टेमाणी कन्या विद्यालय, गांधी नगर, भुसावळ येथे पार पडला.


या कार्यक्रमात सौ. संगिता राजेंद्र भामरे (PLV – अधिकार मित्र) यांनी प्रास्ताविक करून विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले. समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, बालविवाहमुक्त भारत तसेच NALSA बाल-अनुकूल कायदेशीर सेवा योजना 2024 या विषयांवर. तसेच कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करताना पॉक्सो कायदा, NALSA टोल-फ्री क्रमांक व महिलांसाठी उपलब्ध कायदेशीर सेवांची सविस्तर माहितीविधी सेवा तालुका भुसावळ ॲड. मनीषा बाविस्कर यांनी दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक शालिनी वल्के यांनी उपस्थित विद्यार्थिनींना समुपदेशन करत महिलांची सुरक्षितता, तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रिया व स्वतःचे संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्य सौ. सुशिला तुलसी अडवाणी यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विधी सेवा समितीची पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.
या शाळेत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत असून कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित शिक्षकांमध्ये प्रफुल्ल पितांबर दास रामदानी, अश्विनी रमेश बोरसे, सायली गिरीश बेडाळे, प्रभाकर उत्तम राऊत, योगेश्वर वामनराव खिरडीकर, राहुल नारायण पाटील, पल्लवी रामलाल पाटील, प्रसाद अरुण मांडलकर, मुकेश विश्वनाथ इंगळे, कैलास लक्ष्मण काले, कु. अर्चना रमेश शर्मा, सोमदत्त माधव प्रसाद आदींचा समावेश होता. या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर हक्क, सुरक्षितता व बालविवाह प्रतिबंधाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली.



