शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात भिल्ल समाजासाठी जातीचा दाखला शिबिर :

भुसावळ (प्रतिनिधी)- दि. २३ जानेवारी
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील भिल्लवाडी परिसरात भिल्ल समाजासाठी जातीचे दाखले काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शारदा दीपक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिरात एकूण ६० नागरिकांनी आपल्या जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. सर्व लाभार्थ्यांची सर्कल चौकशी पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी शासकीय सुविधा केंद्राचे प्रमुख महेंद्र सपकाळे व कुंदन सुरवाडे यांनी जातीचे दाखले भरण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू ब-हाटे, पिटू भोई, संदीप पाटील तसेच भिल्ल समाजाचे शांताराम भिल्ल यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरामुळे भिल्ल समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आयोजकांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.