मध्य रेल्वे चालवणार भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवणार आहे. तपशील पुढील प्रमाणे –
1) भुसावळ ते मिरज अनारक्षित विशेष गाडी (2 फेरी)
गाडी क्रमांक 01209 विशेष दिनांक 23.01.2026 रोजी भुसावळ येथून 16.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मिरज येथे 08.50 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01210 विशेष दिनांक 26.01.2026 रोजी मिरज येथून 19.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी भुसावळ येथे 12.30 वाजता पोहोचेल.
थांबे – जळगांव, पाचोरा, चाळीसगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली.
संरचना: 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
2) अमरावती ते पनवेल अनारक्षित विशेष गाडी (2 फेरी)
गाडी क्रमांक 01416 विशेष दिनांक 22.01.2026 रोजी अमरावती येथून 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पनवेल येथे 04.00 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01415 विशेष दिनांक 26.01.2026 रोजी पनवेल येथून 19.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमरावती येथे 12.00 वाजता पोहोचेल.
थांबे – बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत.
संरचना: 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावका.


