धोकादायक विद्युत पोल व तारांविषयी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका: महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी )  - भुसावळ शहरातील पंचशील नगर, गौतम नगर व गंगाराम प्लॉट परिसरात काही ठिकाणी महावितरण कंपनीचे धोकादायक विद्युत पोल तसेच लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक २०/०१/२६ रोजी महावितरणचे कार्यकारी अभियंता, भुसावळ यांना याबाबत. नगरसेविका सौ. सीमा नरवाडे यांनी निवेदन दिले.

निवेदन स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी संबंधित ठिकाणी तत्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका सौ. सीमा नरवाडे तसेच विवेक नरवाडे उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.