ठाणे (प्रतिनिधी):
RMSS राष्ट्रीय मोदी सेवा समिती, आर्या बहुउद्देशीय सेवा संस्था, विश्वधर्म अपंग मानव सेवा संघ व जनमैत्रेय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी “दिव्यांग वधू–वर सामूहिक विवाह सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सुमारे 100 दिव्यांग वधू-वरांचा सामूहिक विवाह पार पडणार आहे.

या विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य असून, ही नाव नोंदणी रविवार, दि. 18 जानेवारी 2026 रोजी एन.के.टी. बॅन्केट हॉल, नानजीभाई खिमजीभाई ठक्करवाला (ठाणावाला) कॉलेज, ठाणे (प.) येथे करण्यात येणार आहे. नाव नोंदणीस येताना UDID कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
तसेच, मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी याच एन.के.टी. बॅन्केट हॉल, ठाणावाला कॉलेज, ठाणे (प.) येथे हा दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण सोहळा सर्व दिव्यांग नवदांपत्यांसाठी पूर्णतः मोफत आयोजित करण्यात येत आहे.
या विवाह सोहळ्याअंतर्गत शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 24 अन्वये अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
दोन्ही वधू-वर दिव्यांग असल्यास शासनाकडून ₹2,50,000/- (अडीच लाख रुपये)
एक दिव्यांग व एक सामान्य व्यक्ती असल्यास शासनाकडून ₹1,50,000/- (दीड लाख रुपये)
इतके आर्थिक अनुदान नवदांपत्यास देण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने संसाराची सुरुवात करता यावी, त्यांना आयुष्यभराचा हक्काचा जोडीदार मिळावा, या उदात्त हेतूने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही दिव्यांगांसाठी मोफत विवाह व शासकीय अनुदान मिळविण्याची सुवर्णसंधी असल्याचे आयोजक संस्थांनी स्पष्ट केले आहे.
तरी सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा व तात्काळ नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
9511229212 / 7666021433 / 8652802157
.


