भुसावळ (प्रतिनिधी):
जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा २०२५–२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये कु. वेदांतिका अनुप शुक्ल हिने प्रथम स्तरावर (Level 1) सुवर्णपदक पटकावले आहे. या यशामुळे ती Level 2 साठी पात्र ठरली असल्याची घोषणा आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

कु. वेदांतिका ही भुसावळ येथील प्रा. ह. दलाल सरांची नात असून सौ. अमृता व अनुप शुक्ल यांची ती सुकन्या आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल भुसावळसह सर्वत्र तिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
वेदांतिकाला गणित विषयाची विशेष आवड असून, भविष्यात याच विषयात उच्च शिक्षण घेऊन मोठी पदवी संपादन करण्याचे तिचे ध्येय आहे, असे तिने परीक्षेच्या निकालानंतर बोलताना सांगितले. सध्या ती नवी मुंबई येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


