भुसावळ (प्रतिनिधी ) – चाळीसगाव येथील ( समाजसेवा, पत्रकारिता व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित सुनीता राजेंद्र महाडिक यांना नुकताच ‘”दर्पण रत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे वितरण पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सुनीता महाडिक या लाईव्ह नवं विचार न्यूज च्या मुख्य संपादक असून त्या आयडियल पत्रकार संघ, ठाणे जिल्हाध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ, चाळीसगाव तालुका संघटक, तसेच महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनाच्या सदस्य आहेत. याशिवाय त्या अंबरनाथ भाजपा सोशल मीडिया प्रमुख, चाळीसगाव भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, ठाणे जिल्हा पत्रकार संघ सदस्य, दैनिक अहिल्याराज पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडिया चाळीसगाव सदस्य, जिजाऊ ब्रिगेड चाळीसगाव सदस्य तसेच हिरकणी महिला मंडळ येथे सक्रियपणे कार्यरत आहेत.
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत असल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे सर , महासचिव दिव्या भोसले मॅडम , प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, यांचेसह उज्वला बागुल, भावना शर्मा , भाग्यश्री पाटील, आदिनी सुनीता महाडिक यांचे विशेष अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.


