नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार : वकील कक्षात २४ तास पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी)-
दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळ यांच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी बार असोसिएशनच्या वतीने वकील कक्षामध्ये २४ तास पाणीपुरवठा तसेच न्यायालय परिसर व वकील कक्षात नियमित स्वच्छता करण्यात यावी, याबाबतचे निवेदन नगराध्यक्षांना देण्यात आले.

बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कैलाश जनार्दन लोखंडे यांनी नगराध्यक्षांचा सत्कार करून वकील वर्गाच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी ॲड. सुशील बर्गे, ॲड. गौतम साळुंखे, ॲड. भूपेश बाविस्कर, ॲड. वैशाली चौधरी, ॲड. योगेश बाविस्कर, ॲड. भारमल, ॲड. प्रफुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. अभिजीत मेने यांनी केले.

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास दि लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.