मोरेश्वर पार्क सोसायटीत श्री सत्यनारायण महापूजा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ;

खारेगाव (प्रतिनिधी ) – खारेगाव, कळवा (ठाणे) येथील मोरेश्वर पार्क सोसायटीमध्ये दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडले. या कार्यक्रमास सोसायटीतील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कॅरम स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा संगीत खुर्ची , चित्रकला , धावणे यासह विविध स्पर्धा व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राशी ग्रुपच्या नृत्यप्रस्तुतीने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमा दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. लहान लहान मुलांच्या स्पर्धा धावणे नर्सरी ते प्लेग्रुप प्रथम अभंग कांगणे द्वितीय तनिष गडकर तृतीय साईश रेडकर व श्रीश मनचेकर जुनियर आणि सीनियर केजी धावणे मार्वी ढोके , स्वस्तिका कदम सामर्थ्या कदम , पहिले आणि दुसरी धावणे तनिष राणे ईशान सावंत मोठा गट धावणे क्षितिज सावंत रूही राणे धावणे अभंग कांबळे गंधर्व लोट रियांश शेलटकर पाचवी ते सातवी जीविका महाडिक रुही राणे आठवी ते दहावी रिदम मिश्रा, महिला स्पर्धा बॉल पासिंग श्रेया मुळूका , प्रणिता राणे , संगीत खुर्ची त्रिशा मंचेकर नम्रता रेडकर महिला नृत्य सहभागी जयश्री साळुंखे श्रेया मुळंम राशी सावंत ,प्रणिता राणे मानसी चव्हाण अश्विनी मोरे,संगीत खुर्ची मोठा गट सृष्टी मिश्रा क्षितिज सावंत , संगीत खुर्ची लहान गट जीविका महाडिक प्रांजल लोट , बॉल पासिंग रिदम मिश्रा अद्वित मिश्रा , दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अथर्व पवार अथर्व कांबळे वैभव राजपूत ऐश्वर्या जीकमडे , चित्रकला स्पर्धा पहिली ते चौथी विधी मुळुम , प्रांजल सोट , अद्वित मिश्रा , पुरुष स्पर्धा कॅरम मनीष महाडिक , महेंद्र चव्हाण , यांचेसह विविध स्पर्धांतील विजेत्यांना ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

क्रिकेट स्पर्धेचा थरारक्षितिज सावंत यांना ‘मॅन ऑफ द मॅच’*

दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी मोरेश्वर पार्क सोसायटीच्या सदस्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. A, B, C आणि D अशा चार संघांची निर्मिती करण्यात आली होती. अंतिम सामना टीम A आणि टीम C यांच्यात झाला, ज्यामध्ये टीम C विजयी ठरली.
टीम C मधील खेळाडू: क्षितिज सावंत, मनीष महाडिक, दीपक पाटील, प्रज्ञेश, प्रशांत कांगणे, रिचर्ड रेड्डी. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी क्षितिज सावंत यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले. तसेच योगेश रेडकर यांच्या फलंदाजीचे विशेष कौतुक करण्यात आले.
यशस्वी आयोजन
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बाबाजी मंचेकर व सौ. कविता रुपेश राणे यांनी केले. गाणी नियोजनाची जबाबदारी दिव्येश राणे यांनी पार पाडली. क्रिकेट स्पर्धेचे नियोजन प्रसाद मंचेकर, प्रशांत कांगणे व महेंद्र चव्हाण यांनी केले.तर निमंत्रण पत्रिका मनीष लोट यांनी यासह कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल लोट , आरोही लोट ,प्रीती कांगणे, प्रशांत कांगणे , राजश्री सावंत
अश्विनी मोरे , अनन्या शेलटकर, प्रिशा मंचेकर, कविता राणे , शैलेश कांबळे , प्रणय शिंदे , अंकिता शिंदे , सुधीर महाडिक , सदानंद कोण्डविलकर, अनघा पवार , जयश्री साळुंखे ,
सुनील साळुंखे , श्रेया मुलम , सत्यवान मुलम , प्रणिता राणे , मानसी चव्हाण , भीमसेन शेलटकर, साईराज चव्हाण , कविता काशिनाथ राणे ,अथर्व पवार , देवेंद्र लोट , सावंत काका , ऐश्वर्या जिकमडे यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. पूजाआयोजन व अन्य उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व सदस्यांचे मोरेश्वर पार्क सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.