आरोग्यासाठी धावा – ‘रन भुसावळ’ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) -:रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी “आरोग्यासाठी धावा – रन भुसावळ” हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. भुसावळकरांमध्ये व्यायामाची सवय लागावी तसेच धावणे व चालणे याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात १० किलोमीटर फिटनेस रन, ५ किलोमीटर अवेअरनेस रन आणि ३ किलोमीटर फन रन असे तीन प्रकार असणार आहेत. रन भुसावळची सुरुवात सकाळी ६.०० वाजता होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूंना टी-शर्ट, बॅग, नाश्ता देण्यात येणार असून लकी ड्रॉद्वारे विविध गृहपयोगी वस्तूंचेही वितरण करण्यात येणार आहे.

या आरोग्यविषयक उपक्रमात सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी, युवक-युवतींनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन सुयश न्याती, को-चेअरमन चेतन पाटील, अध्यक्ष देवेंद्र वाणी व सचिव हरमितसिंग माखन यांनी केले आहे.