भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून भाजपच्या उमेदवार उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या प्रभागातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र, संबंधित उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरल्याने उज्वला बेंडाळे यांचा मार्ग मोकळा झाला. परिणामी त्या बिनविरोध निवडून आल्या.
या निवडीमुळे जळगाव महापालिकेत भाजपला पहिला यशस्वी टप्पा गाठता आला असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिनविरोध निवडीनंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.



