भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रचार मुदतीनंतर प्रचार साहित्य हटविण्याचे निर्देश


भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार प्रचाराची अधिकृत मुदत १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या मुदतीनंतर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी भुसावळ निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी निर्देश दिले आहेत की, १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेनंतर शहरातील सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी लावलेले झेंडे , बॅनर ,पोस्टर , होर्डिंग्ज , फ्लेक्स यांसारखी सर्व प्रचार सामग्री तात्काळ हटविण्यात यावी. याबाबत संबंधित पथकांना व स्थानिक प्रशासनाला याबाबत आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.