भुसावळात पोस्टल मतदानाचा पहिला दिवस 52 टक्क्यांवर; आजही प्रक्रिया सुरू

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड तसेच निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान वाया जाऊ नये, यासाठी शनिवारी (29 नोव्हेंबर) प्रांताधिकारी कार्यालयात पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली. पहिल्या दिवशी 305 कर्मचार्‍यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने प्रक्रिया 52 टक्क्यांवर पोहोचली. रविवारी (30 नोव्हेंबर) देखील सकाळी 10 ते संध्याकाळी 6 यावेळेत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

शिस्तबद्ध वातावरणात मतदान

शनिवारी सकाळी 10 वाजता पोस्टल मतदानास प्रारंभ झाला. कागदपत्रांची पडताळणी करून पात्र कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले. मतदान केंद्रात सीसीटीव्ही निरीक्षण, मदत कक्ष, दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी सुविधा अशा आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या.
निवडणुकीच्या दिवशी शहरातील विविध मतदान केंद्रांवर ड्युटीवर राहणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ही सोय मोठा दिलासा ठरली आहे.

रविवारीही प्रक्रिया सुरू

रविवार, 30 नोव्हेंबर रोजीही हीच प्रक्रिया सुरू राहील. प्रांताधिकारी कार्यालयात सकाळपासूनच कर्मचार्‍यांची रांग दिसून आली. ओळखपत्र तपासणी केल्यानंतर संबंधितांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला.

मतदान साहित्य वाटपाबाबत सूचना

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी शनिवारी संबंधित कर्मचार्‍यांची बैठक घेतली. त्यांनी मतदान साहित्य अत्यंत काळजीपूर्वक, मतदान केंद्रनिहाय आणि योग्य फॉर्मासह देण्याच्या सूचना दिल्या. तसेच मतदान यंत्रे देताना आणि परत घेताना कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.

खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी हे दैनंदिन निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असल्याने कार्यालयात दररोज गर्दी होत आहे. खर्च वेळेत सादर न केल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते, म्हणून उमेदवार सकाळी 11 ते संध्याकाळी उशिरापर्यंत खर्च सादर करण्यासाठी उपस्थित राहत आहेत.

घटनेमागील नेमके कारण, दाम्पत्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांकडून अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.