भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक महाविद्यालय, भुसावळ येथे तालुका विधी सेवा समिती भुसावळ द्वारा विधी शिबिर घेण्यात आले , या शिबिरा मध्ये महिला/मुली विद्यार्थिनींना त्यांचे संरक्षण व गुप्तता अधिकार बाबतचे कायदेशीर तरतुदी व कायद्याबाबत माहिती देण्यात आली.
शिबिरामध्ये प्रमुख वक्ते तालुका विधी सेवा समिती भुसावळ चे रिटेनर वकील ॲड .अभिजीत मेने होते, तसेच कार्यक्रम चे आयोजन करण्यासाठी विधी समिती चे पिएलव्ही रूपाली नेवे यांनी काम केले
सदरील शिबिर मध्ये ॲड.अभिजीत मेने यांनी महिलांच्या संरक्षणासाठी चे विशेष कायदे व विशेष कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच गुप्ततेचा अधिकार याबाबत भारतीय संविधाना मध्ये दिलेल्या अधिकारा बाबत संपूर्ण माहिती दिली ,तसेच पिएलव्ही रूपाली नेवे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण भुसावळ यांचे माहिती पत्रक वाटले, व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले व सदर कार्यक्रम आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमात पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक महाविद्यालय भुसावळ चे मुख्याध्यापक पी.जे.चौधरी, प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापिका हेमांगी चौधरी, शिक्षक जयश्री चौधरी ,ममता फालक, नीलकमल भोळे, चैताली चौधरी,पी.एम. परखड,डी. जी. तायडे, दिपाली सरोदे, सुनिता बऱ्हाटे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.



