भुसावळात चंपाषष्टीनिमित्त खंडोबा मंदिरात उधळला भंडारा :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज चौफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्टीनिमित्त भाविकांनी ‘सदानंदाचा येळकाेट येळकाेट जय मल्हार’ चा गजर करीत. भंडारा वउधळीत श्री खंडाेबा रायाचे दर्शन घेतले.
बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी श्री खंडोबास अभिषेक पूजा व भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवित भाविकांच्या उपस्थितीत दिवटी बुधलीसह सवाद्य खोबरं तळी उचलीत भाविकांनी भंडारा उधळला.
या कार्यक्रमांसाठी गजानन चाैधरी, रवींद्र चाैधरी, नीळकंठ चाैधरी, मंगल परदेशी, विनाेद रेंभाेटकर, विष्णू चाैधरी, रघुनाथ चाैधरी, याेगेश चाैधरी, तुषार चाैधरी, रतनमामा व मालतीबाई चाैधरी यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन. .