संस्कृती मेढे हिची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टीम मध्ये निवड ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी संस्कृती मेढे हीची राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्ष आतील टिमच्या फुटबॉल टीम मध्ये निवड झाली आहे. ती नागालेंड येथे महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या वतीने एक हप्ता फुटबॉल मॅच खेळणार आहे. तिच्या या निवडीबद्दल ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर,संस्थाध्यक्ष डॉ. मोहन फालक,चेअरमन महेश फालक यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. तिला कोच अर्जुन सणस,अकबर खान, डॅनियल पवार,विजय संकत,आकाश परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कुलची विद्यार्थिनी संस्कृती मेढे हीची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल टीम मध्ये निवड झाल्या बद्दल तिचे कौतुक करतांना प्रिंसीपल निना कटलर