भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे १९ वर्षा आतील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जळगाव जिल्हा मुले / मुलींचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि.२३ रोजी दुपारी २.०० वाजता सेंट अलायसेस शाळेच्या मैदानावर भुसावळ येथे होणार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धा नंदुरबार येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. निवडलेले विद्यार्थी जळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करतील. ३० नोव्हेंबर २००४ नंतर जन्मलेले खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र असतील. इच्छुकांनी सोबत आधार कार्ड व जन्म दाखला आणावा तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट गणवेशात यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असो. चे जिल्हा सचिव वासेफ पटेल व क्रीडा शिक्षक मेघशाम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


