भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली आज गुरुवार रोजी १३ उमेदवारांची माघार घेतली आहे . यामध्ये

प्रभाग 17 ब व 17 अ मधून पिंजारी जुलेखा अकिल , प्रभाग 24 ब मधून पूजा अजय विसपुते ,प्रभाग 4 ब मधून ज्योती आनंदअवसरमल , प्रभाग 20 ब विजय मोतीराम चौधरी , प्रभाग 17 अ मधून शे.सलीम शे नादर ,प्रभाग12 अ बागवान जुबेर समरीन ,प्रभाग 9 अ वैभव युवराज लोणारी, प्रभाग 2ब अहिरे गौरी दिनेश, प्रभाग 24 अ अनिकेत प्रवीण पाटील , प्रभाग 11 अ देवेंद्र सीताराम वाणी , प्रभाग 13 अ नितीन राजेंद्र वाघ , प्रभाग 2 ब यामिनी जितेंद्र राणे या तेरा उमेदवारांनी त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे उद्या शेवटच्या दिवशी अजून कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांसह राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.


