भुसावळ (प्रतिनिधी) : भावाचा खून झाला असून तत्काळ मदतीला या म्हणत एकाने मध्यरात्री 112 वर फोन केला. यंत्रणेने तत्काळ आलेल्या मेसेजची दखल घेत घटनास्थळ गाठले मात्र घटनास्थळी जाताच संबंधिताना मोबाईल बंद केला मात्र संबंधिताने दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी खातरजमा केली असता खुनाची कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. मध्यरात्री विनाकारण पोलिसांना मानसिक त्रास देणार्या मठ्ठा विक्रेत्याविरोधात दुसर्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संशयीत बाळू कापसे (गांधी नगर, भुसावळ) हा मठ्ठा विक्रीची काम करून नातेवाईकांसोबत वास्तव्याला आहे. 28 रोजी रात्री 12.30 वाजता संशयीत बाळूने 112 क्रमांकावर फोन लावत आपल्या भावाचा खून झाला असल्याचे सांगत तातडीने यावे म्हणून निरोप दिला. कंट्रोल रूमवरून तातडीने हा मेसेज बाजारपेठ पोलिसांना गेल्यानंतर कॉन्स्टेबल हर्षल महाजन व कॉन्स्टेबल मनोज भागवत गालफाडे हे कमन सर्व्हिस सेंटर, गांधी नगर भागात दाखल झाले मात्र त्याचवेळी संबंधिताने फोन बंद केल्यानंतर पोलिसांनी संशयीताचे घर शोधले असता खुनाचा प्रकार ही निव्वळ अफवा ठरल्यानंतर दुसर्या दिवशी संशयीत बाळू कापसे विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 212 व 217 अन्वये कॉन्स्टेबल गालफाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.



