भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून महिला, तरुणी, बालिका यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे.महिला आयोग फक्त दिखाऊ झालेला आहे.पिडित महिलांना सौ.चाकणकर न्याय देऊ शकत नाही.त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे ( उबाठा)उपजिल्हा प्र.प्रमुख व मा नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि, राज्यातील महिला, तरुणी सुरक्षित राहिलेल्या नाहीत.छ.शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होणे ही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने लज्जास्पद बाब आहे.पिडीत महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आणि अध्यक्षपदी सौ.रूपालीताई चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.परंतु आता पर्यंत एकाही पिडित महिलेला न्याय मिळालेला नाही.त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी सुरवाडे यांनी केली आहे.नुकत्याच डॉ संपदा मुंढे यांनी आत्महत्या केली आहे.त्यासंदर्भात ही मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.



