भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ तालुका कार्यकारिणी गठित –

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भुसावळ तालुका शाखा गठित करण्यासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली .
याप्रसंगी रवींद्र गुरचळ महाराष्ट्र राज्याध्यक्ष, शुभांगी ताई डोंगरे नाशिक विभाग प्रभारी , प्रमिला किशोर भालेराव जळगाव जिल्हाध्यक्ष , चंद्रकांत यशवंत निकम जिल्हा उपाध्यक्ष, किशोर रामदास भालेराव जिल्हा कोषाध्यक्ष, संजय भीमराव गुरचळ जिल्हा संघटक, मनीष शशिकांत साबळे जिल्हा मीडिया समन्वयक आदी उपस्थित होते .
नव्याने गठीत केलेल्या भुसावळ तालुका सन 2025 च्या कार्यकारणी मध्ये वासुदेव निळकंठ सुरवाडे भुसावळ तालुका अध्यक्ष, सागर चांगो सावळे तालुका उपाध्यक्ष, प्रमिला संजय गुरचळ तालुका महासचिव, किर्ती मनिष साबळे तालुका कोषाध्यक्ष, हरिचंद्र देवचंद इंगळे तालुका सहकोषाध्यक्ष, गौतम रामदास बोदडे तालुका मुख्य संघटक, अक्षय संतोषराव सुरवाडे तालुका विहार समन्वयक, अनिल सुकदेव सुरवाडे तालुका संस्कार समन्वयक याप्रमाणे जळगाव जिल्हा कमिटी अंतर्गत तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली अशी माहिती जळगाव जिल्हा मिडिया समन्वयक मनीष शशिकांत साबळे यांनी दिली.