आता “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “ छत्रपती संभाजीनगर होण्यास मान्यता ”

मुंबई – “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN” असा असेल.

त्यामुळे “औरंगाबाद” रेल्वे स्थानकास आता पुढे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.


.