भारत विकास परिषदेतर्फे ‘ राष्ट्रीय समूहगान व भारत को जानो’ स्पर्धा उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी) – भारत विकास परिषद शाखा भुसावळ तर्फे राष्ट्रीय समूहगान स्पर्धा तसेच भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रभाकर हॉलमध्ये उत्साहात पार पडल्या. सौ. रजनीताई सावकारे, सौ. आरती चौधरी, डॉ. नीलिमा नेहेते, श्री. योगेश मांडे, श्री. सतीश खडायते व हरीश कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन झाले. या वेळी दीपिका हिंगवे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.
या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत भुसावळ शहरातील एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल ,
द्वितीय क्रमांक बियाणी मिलिटरी स्कूल ,
तृतीय क्रमांक एन. के. नारखेडे विद्यालय यांनी प्राप्त केला .
भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण 24 शाळांचा सहभाग होता.
यात लहान गट : प्रथम – के. नारखेडे विद्यालय, द्वितीय – बियाणी मिलिटरी स्कूल, तृतीय – वर्ल्ड स्कूल तर मोठा गट : प्रथम – आदर्श हायस्कूल, द्वितीय – के. नारखेडे विद्यालय, तृतीय – पी. के. कोटेचा हायस्कूल यांचा सहभाग होता .
विजयी संघांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सौ. रजनीताई सावकारे, आकाश पाटील, अविनाश मुजुमदार, किशोर शिंपी, आरती चौधरी व चेतन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविक शाखा पालक डॉ. नीलिमा नेहेते यांनी केले. अध्यक्ष सतीश खडायते यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राहुल पांडे यांनी प्रमुखांचा परिचय करून दिला, तर सौ. अनघा फडके यांनी परीक्षकांचा परिचय केला. सचिव हरीश कोल्हे यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन प्रा. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाला श्री. योगेश मांडे, डॉ. छाया चौधरी, विलास फालक आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी राधा चव्हाण, स्मिता बेंडाळे, वंदना खडायते, विधी मेहता, कविता हीरोडकर, जयश्री चौधरी, चेताली अग्रवाल, शंतनु गचके, रमाकांत भालेराव, कुणाल महाजन, गौरव हिंगवे, कपिल मेहता, अनुप धावडे, भूषण वैद्य, सुजित भोळे, सुनील इंगळे, आनंद फडके व अभय विसपुते यांनी परिश्रम घेतले.