देशाच्या 15 व्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी.राधाकृष्णन –

मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या 15 व्या उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे खासदार सीपी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले. त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांना 452 मते तर त्यांचे विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. राधाकृष्णन यांनी ही निवडणूक 152 मतांच्या फरकाने जिंकली.

राज्यसभेचे अध्यक्ष पदही भूषवणार
उपराष्ट्रपती पदासोबत राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत ते अस्थायी राष्ट्रपती म्हणून देखील कार्य करतील, तसेच राज्यसभेचे अध्यक्ष पदही भूषवतील. ठडड शाखेतून राजकीय जीवन सुरू करणारे, शांत आणि अनुभवी नेता, अशी सी.पी.राधाकृष्णन यांची ओळख आहे.

सी.पी.राधाकृष्णन दोन वेळा खासदार
सी.पी.राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. सी.पी.राधाकृष्णन दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.