भुसावळ (प्रतिनिधी) : दीपनगरात राखेचे कंत्राट का घेतले? म्हणत जाब विचारत सुपरवायझरसह तिघांना मारहाण करण्यात आली व पाच हजार दोनशे रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर रविवार, 7 रोजी दुपारी पाच वाजता घडली. याप्रकरणी निंभोर्याच्या तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख अशफाक शेख सगीर (33, ग्रीन पार्क, गल्लीनंबर 2, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत दीपक मधुकर हातोले, किरण मधुकर हातोले व दिनेश त्र्यंबक खंडारे (सर्व रा.निंभोरा, ता.भुसावळ) यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता दीपनगर प्रकल्प गेट समोर तक्रारदाराच्या अत्रैय कंपनी, नाशिक यांनी फ्लॅश (कोरडी राख) चे कंत्राट का घेतले ? म्हणत वाद घातला तसेच कंपनी बल्करद्वारे फ्लॅश (कोरडी राख) वाहतूक का करते म्हणत तक्रारदाराच्या तोंडावर तसेच डोक्यावर उजव्या बाजुस रॉडने व फाईटने मारुन दुखापत केली तक्रारदारासोबतच्या अब्दुल अदनान अब्दुल रहेमान कुरेशी यांच्या उजव्या पायाचे मांडीवर रॉडने मारुन व अमर बहादुर सिंह सुर्यबली सिंह यांना आरोपींनी तोंडावर फाईटने व चापटा-बुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली.

किरण मधुकर हातोले याने फिर्यादीच्या खिशातील पाच हजार दाोनशे रुपयांची रोकड हिसकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.


