मोहित नगरच्या लयभारी गणेश मंडळातर्फे सांस्कृतिकसह रंगल्या विविध स्पर्धा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील मोहित नगर येथील लयभारी गणेश मंडळ यांनी या वर्षी गणेश उत्सवाचे ११वे वर्ष निमित्त लई भारी कार्य करीत सांस्कृतीक कार्यक्रमासह विविध स्पर्धा घेऊन मंडळाच्या लौकिकात कौतुकाची थाप मिळवली आहे . यंदा महिलां भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून यापुढे देखील उत्कृष्ट कार्य करण्याचा मानस केला आहे .

अत्यंत शिस्तबद्ध नियोजन व आयोजन करण्यात आले होते. या वर्षी लयभारी गणेश मंडळाचे 11 वे स्थापना वर्ष होते. या वर्षाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री गणपती मूर्ती आकर्षक,विलोभवनीय, उंच 12 फूट उंच मोरावर आरूढ विराजमान असलेली आहे.या वर्षी मंडळा तर्फे विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला वर्गा, लहान मुले, मुली करिता समूह नाटिका, गीत गायन,संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, बादलीत बॉल टाकने, या सर्व प्रकारच्या विविध स्पर्धेत महिला वर्ग यांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता. मंडळाचे अध्यक्ष शरण महाले, आकाश चव्हाण, नितेश वाणी, नमन कांदे, मंडळाचे सर्व सदस्य, बाल कलाकार,महिला मंडळ यांनी सहभाग घेऊन विविध संस्कृतिक कार्यक्रमा च्या नियोजना साठी परिश्रम घेतले. विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिस देण्यात आले