बियाणी एज्युकेशन ग्रुप तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

.
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी एज्युकेशन ग्रुप तर्फे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवार दि ७ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शिक्षकांनी सुंदर असे समूह नृत्य,फिल्मी गीत,विनोदी तसेच राजकीय व सामाजिक विषय मांडणाऱ्या नाटिका आदींचे उत्कृष्टपणे सादर करीत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक असलेल्या गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच काही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. शिक्षकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर,सामाजिक,कौटुंबिक,पारंपारिक तसेच विनोदी नाटिका,समूह नृत्य याने मान्यवर तसेच प्रेक्षक भारावून गेले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते तर उद्घाटक म्हणून सत्यनारायण सोनी व प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पीएसआय भारती काळे,सुयश न्याती,उपाध्यक्ष विनोद बियाणी,सचिव डॉ.संगीता बियाणी,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्मिता बियाणी,रोनक बियाणी हे उपस्थित होते. या वेळी राजेश पारिक, प्रवीण भराडिया,सागर काळे,गोटू लाहोटी, इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.परीक्षक म्हणून मनीषा काबरा, तृप्ती नागोरी हे होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.आयुषी रोनक बियाणी व विद्यार्थीनी कोमल लाहुडकर व देवेश ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी एम पाटील यांनी मानले.

फोटो कॅप्शन – बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करताना पोलीस उपनिरीक्षक भारती काळे,सोबत डावीकडून प्रवीण भराडीया,राजेश पारिक,सत्यनारायण सोनी,डॉ.संगीता बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी, मनीषा काबरा आदि.