भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित दि.23-24 ऑगस्ट दरम्यान “युवा कार्यकर्ता अभ्यास वर्ग”
आयुध निर्माणी वरणगांव येथे भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश, यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला . या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय सावकारे , वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रमुख अतिथी आयुध निर्माणी वरणगांव चे मुख्य महाप्रबंधक .झेड सरवर व महाप्रबंधक महेश शिंदे, व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे प्रमुख मार्गदर्शक मा.अरुण सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, अभय विसपुते, किशोर पाटील, सचिन लाडवंजारी, बाळासाहेब भुजबळ, प्रविण अमृतकर उपस्थित होते.

या दोन दिवसीय निवासी अभ्यासवर्गात जळगांव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे व नंदुरबार अश्या सहा जिल्ह्यांमधुन 150 युवा प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. कामगार चळवळीचा इतिहास, संगठन, भारतीय मजदूर संघ रीती-निती, पेन्शन योजना NPS/UPS, योगाभ्यास,
कामगार कायदे व असंगठीत क्षेत्र तसेच कल्याणकारी कार्य व शासकीय योजना आदी विषयांवर प्रशिक्षण होणार आहे.
अनेक उद्योगांमधील संघटीत व असंघटीत श्रमिक सहभागी झालेले आहेत.
आयुध निर्माणी वरणगांव मधील भारतीय मजदूर संघाची वरणगांव ऑर्डनन्स एम्प्लॉईज सॉलिडारीटी युनियन व आयुध निर्माणी भुसावळ मधील आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे कार्यकर्ते अभ्यास वर्गाच्या यशस्वितेसाठी परीश्रम घेत आहेत.


