भुसावळ प्रतिनिधी
गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक आणि ख्यातनाम संगीत आचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळ शहरातील प्रतिथयश श्रीराम संगीत विद्यालय आणि शहरातील संगीत शिक्षका तर्फे शास्त्रीय संगीत सोहळा शहरातील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला .
श्रीराम संगीत विद्यालय आणि शहरातील विविध संगीत शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तबला वादन, नृत्य आणि गायनाचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.


प्रारंभी श्री बालाजी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बृजभूषण अग्रवाल यांच्या हस्ते पं. पलुस्कर आणि पं. भातखंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली.
शहरातील सर्व संगीत शिक्षकांनी ईशस्तवन व प्रार्थना सादर केली.
स्मिता कुलकर्णी, योगेश साळशिंगीकर, शिरीष जोशी, तेजस मराठे, अनिता पाटील, सुनील पवार, मयूर शहा, तृप्ती शहा, चारूलता भालेराव आणि जितेश मराठे या संगीत शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, सिंथेसायझर वादन, कथ्थक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक किरण सोहळे आणि पल्लवी बालाजीवाले यांनी केले.
यावेळी संगीत शिक्षक सुरेश पाटील, योगेश साळशिंगीकर, सुनील पवार यांनी राग भैरवी गाऊन या सोहळ्याची सांगता करण्यात आली. तसेच राग भैरवीवर शिरिष जोशी, वैभव काटे आणि तेजस मराठे यांनी गायन सादर केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमाकांत भालेराव, तेजस बालाजीवाले, अनिता वाघमारे, मानव घुले, अभिषेक चौधरी आदींनी परिश्रम घेतले .



