भुसावळ शहरातील नागरिकांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी- बोगस मतदार, नागरी सुविधांचा अभाव आणि धोकादायक शाळा इमारतीचा गंभीर मुद्दा

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील तीन अत्यंत गंभीर आणि जनहिताच्या मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करत प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
या तक्रारींमध्ये मतदान यादीतील बोगस व मयत मतदारांची नावे, १५ वर्षांपासून प्रलंबित नागरी सुविधा, तसेच धोकादायक शाळा इमारतीचा धोका यांचा समावेश आहे.
प्रभागातील बोगस मतदारांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
भुसावळ शहरातील पटेल कॉलनी येथील रहिवासी इल्यास इक्बाल मेमन यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केलं की,
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत स्थानिक अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. त्यांनी मागणी केली की
अशा अपात्र मतदारांची नावे तात्काळ वगळावीत.

२०१६ पासूनच्या सर्व अर्जांची चौकशी व लेखी उत्तर द्यावे.

संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी.

पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी कारवाईचा अहवाल प्रसिद्ध करावा.

१५ वर्षांपासून नागरी सुविधा नसलेल्या प्रभागांतून नागरिकांचे रोषाचे निवेदन

मेहमूद अली रोड, खडका चौफुली परिसरातील हजारो नागरिकांनी नियमित घरपट्टी भरूनही पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व शिक्षण व्यवस्था या मूलभूत सेवा न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रमुख समस्या:

गळतीची पाईपलाईन, अपुरा पाणीपुरवठा

अंधारमय रस्ते, बंद स्ट्रीटलाईट

उखडलेले रस्ते व वाहतूक खोळंबा

तुंबलेले नाले व सांडपाण्याचा रस्त्यावर प्रवाह

अपूर्ण फवारणी, उघडी मुतारी, ओपन स्पेसचा अपवापर

आरोग्य व शिक्षण सेवा पूर्णतः कोलमडलेली
मुख्य मागण्या:
जिल्हाधिकारीमार्फत सर्वेक्षण व विशेष अहवाल तयार करावा
१५ वर्षांची कामे व खर्चाचे ऑडिट व्हावे
दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर PC Act अंतर्गत कारवाई करावी
सार्वजनिक जनसुनावणी व प्रभागनिहाय कृती आराखडा तयार व्हावा

उर्दू शाळा क्र. 3 व संलग्न शाळांची इमारत कोसळण्याच्या मार्गावर – तातडीच्या कारवाईची मागणी
मोहम्मद अली रोडवरील उर्दू शाळा क्र. 3, 20, 21, 22 या शाळा सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या असून सध्या त्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. स्लॅब गळणे, पाणी गळती, उघडी वीज वायरिंग, प्लास्टर उखडलेले असे अनेक गंभीर धोके असताना शाळा सुरूच आहे, हे पालकांसाठी चिंता निर्माण करणारे आहे.

मागण्या खालील प्रमाणे:
धोकादायक इमारत तात्काळ जमीनदोस्त करून नवीन इमारतीचे काम सुरू करावे
तात्पुरत्या वर्ग खोल्यांसाठी निधी व जागा उपलब्ध करून शिक्षण सुरळीत करावे
मुख्याधिकारी यांच्यावर चौकशी व विलंबाची जबाबदारी निश्चित करावी

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, शिक्षण साहित्य यांची व्यवस्था तातडीने व्हावी

जिल्हाधिकारी स्वतः पाहणी करावी – अन्यथा संभाव्य अपघातास प्रशासन जबाबदार राहील

तक्रारदारांची चेतावणी: कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने पुढील लढा
मुस्लिम कब्रस्तान साठी विविध कामे करून त्यासाठीचा अंदाज व ठराव दोन्ही वेळा मंजूर करण्यात आले.

२०१९ व २०२२ आणि २०२४ साली नगरपरिषद बैठकीत विषय संमत करण्यात आला होता.
संबंधित जागेवर वीज, पाण्याची सोय व ठंडे पाण्याची मशीन, संरक्षक भिंत, रस्ता, नाली, पतरेचा शेड, बैठना साथी बेंच आणि स्ट्रीट लाइट व कंपाउंड वॉल योजना मंजूर होती.

आज पर्यंत कोणतेही ही काम नगर पालिका प्रशासन ने करूं दिलेले नहीं

या सर्व तक्रारींसोबत पुरावे, फोटो, व्हिडिओ सादर करण्यात आले असून, इलीयास मेमन व हबीब चव्हाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,

जर या तक्रारींवर वेळेत कार्यवाही झाली नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने उच्च स्तरावर पाठपुरावा करणार आहोत.

या तिन्ही तक्रारी प्रशासन, नगरपालिका आणि निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात. लोकशाही व्यवस्था सक्षम राहण्यासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच प्रशासनाची तितकीच जबाबदारी असते.