भुसावळ ( २८ जुलै प्रतिनिधी ) –
भुसावळ तालुक्यातील विल्हाळे गावात कपिलेश्वर महादेव मंदिराची पारंपरिक मुकुट मिरवणूक सोमवार दिनांक २८ जुलै रोजी भर पावसातही मोठ्या उत्साहात साजरी झाली. पावसाची रिमझिम सर असूनही ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, बँड, पालखी आणि सजवलेला मुकुट घेऊन शेकडो भक्त सहभागी झाले होते. या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रो दयोग मंत्री तथा आमदार संजय सावकारे, मंदीर ट्रस्ट अध्यक्ष पंढरीनाथ महाराज सर्व सदस्य तसेच विविध संत-महंत व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.

या मुकुट यात्रेच्या निमित्ताने कपिलेश्वर महादेव मंदिराच्या हेमाडपंथी वास्तुशैलीतील ऐतिहासिक मंदिराच्या जिर्णोद्धाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धार्मिक विधी, पूजा-अर्चा, अभिषेक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्ण गावातून डीजे व मंगल वाद्याच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी श्रावण सोमवार निमित् फराळ वितरण करण्यात आले कपिलेश्वर महादेवाच्या दर्शना साठी रांगा लागल्या होत्या .
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट समितीच्या सहकार्याने करण्यात आले.
या प्रसंगी बाहेर गावाहुन मोठया शहरातून नागरीक दर्शना साठी उपस्थित झाले होते विशेष म्हणजेश्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने या दिवशी शिवाच्या पूजेला महत्त्व असल्याने महिला भगिनींनी या उत्सवात मोठा सहभाग घेतला होता भर पावसात सुद्धा या मिरवणुकीमध्ये या भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .
विल्हाळे येथील शेकडो वर्षापूर्वीचे हे महादेव मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते .या मंदिराचे दगडी खांब व दगडावर कोरीव काम आजही कायम आहे . हेमाडपंथी मंदिराच्या सर्व काही निशाण्या उपलब्ध आहेत . पुरातत्त्व विभागाने अनेक वेळा या ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या आहे .
शंकराच्या आरती मध्ये उमा वेल्हाळा या शब्दाचा उल्लेख असल्याने या महादेव मंदीरांचा व गावाच्या नावाचा समावेश असल्याचे भाविक मानतात .
उत्सव शांततेत आणि भक्तिभावात पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पुढील वर्षीही अधिक मोठ्या उत्साहात यात्रा साजरी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सदर मुकुट यात्रा उत्साहात पार पडण्यासाठी वनवा पोलीस स्टेशनचे एपीआय अमित कुमार बागुल तसेच सहाय्यक फौजदार श्रावण जवरे ,पीएसआय जैन ,पो हे कॉ बावीस्कर आदींनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता



