भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय मजदूर संघाला 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
23 जुलै 1955 रोजी स्थापना झालेल्या भारतीय मजदूर संघाचा आता वटवृक्ष झाला आहे.
भारतीय मजदूर संघ संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कल्याणकारी कामे सदैव करण्यात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन( ILO) मध्ये देखील भारतीय मजदूर संघ आपल्या देशाचे नेतृत्व करत आहे. भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्हा तर्फे 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोटार सायकल रॅली दि.25/07/2025 रोजी दुपारी 04 वाजता काढण्यात आली. सदरची मोटार सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आयुध निर्माणी भुसावळ येथून पुढे महात्मा गांधी पुतळा लोखंडी पूल पांडुरंग टॉकीज जामनेर रोड नाहाटा कॉलेज खडका चौफुली फेकरी गावं मार्गे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर पर्यंत काढण्यात आली.


दीपनगरला समारोप प्रसंगी भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष अभय प्रकाश विसपुते यांनी उपस्थित सर्व कर्मचारी बंथुना मार्गदर्शन केले. तसेच अनंत जाधव उपाध्यक्ष वीज कामगार महासंघ, भानुदास सपकाळे, किशोर सपकाळे आणि किशोर सुर्यवंशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या समारोप कार्यक्रमात आयुध निर्माणी भुसावळ येथे झालेल्या निवडणुकीत बहुमत सिद्ध केलेल्या कार्यकर्ते अमोद भारंबे, प्रशांत सोनवणे, पंकज पाटील,लतेश वारुळकर यांचा सत्कार करण्यात आला. या मोटार सायकल रॅली मध्ये संरक्षण उद्योग रेल्वे उद्योग तसेच वीज उद्योग मधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोटार सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी सुरज मुरई, विजय जगताप, योगेश सुर्यवंशी,विकास नेमाडे, तुषार झोपे, भुषण पाटील, विकास सोनवणे, अरविंद वाजपेयी, हेमंत फडे, विनोद मातळे, विनोद महाजन, गोपाळ नेहे, संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, रामानंद लाहुडकर, जयसिंग कदम, चंद्रसिंग बोरसे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



