भुसावळ (24 जुलै /प्रतिनिधी) ः बदलत्या जीवन शैलीमुळे नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे आजार बळावल्यानंतरच आपण रुग्णालयाची पायरी चढतो व अनेकवेळा तपासणीत आजारांच्या व्याधी जडल्याचेही दिसून येते त्यामुळे निरोगी आयुष्य जगायचे असेल तर नियमित आरोग्य तपासणी करावी, दररोज पहाटे पायी फिरावे शिवाय आहाराचे पथ्य पाळावे, असे आवाहन भुसावळातील डॉ.सांतनू कुमार साहू यांनी येथे केले. शहरातील खडका रोडवरील डॉ.एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते.

52 शिक्षकांची तपासणी
भुसावळातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व एम.आय.तेली इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने खडका रोडवरील एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी मंगळवार, 22 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना निरोगी आरोग्याविषयी टीप्स डॉ.साहू यांनी दिल्या.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात व्यासपीठावर स्कूलचे अध्यक्ष हाजी मुन्ना तेली, माजी नगरसेवक साबीर शेख, अयुब सर, रहिमुद्दीन सर, सुलेमान सर, स्कूलचे प्राचार्य सैय्यद वाजीद अली, गोल्डन अवर रुग्णालयाच्या डॉ.सना शेख, स्टाफ नर्स खुशी कासडे, शिवानी सावळे, पीआरओ गणेश वाघ उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांचे शाळा प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.
गरजूंवर वेळीच उपचार ः मुन्ना तेली
मुन्ना तेली यांनी प्रास्ताविकात गोल्डन अवरने विद्यालयातील शिक्षकांसाठी राबवलेल्या मोफत आरोग्य शिबिर उपक्रमाचे कौतुक केले. शहरात 24 तास आरोग्य सुविधा देणार्या गोल्डन अवर रुग्णालयाचे त्यांनी कौतूक करीत या रुग्णालयात विविध योजनेतून उपचार केले जात असल्याचे व डॉ.साहू यांच्या उपचार पद्धत्तीचे तोंड भरून कौतुक केले.


