९ वे पर्यावरण संमेलन २०२५ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार ; जिल्हाधिकारी यांची पर्यावरण स्नेह भेट ;


नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे ९ वे पर्यावरण संमेलन २०२५ चे आयोजन शक्तिपीठ माहूरगड येथे संपन्न होणार आहे या संमेलनाचे प्रमुख उद्घाटक म्हणून *जिल्हाधिकारी राहुल कर्डिले * यांना निमंत्रित करण्यात आले आहे .

यावेळी राहुल कर्डीले यांनी सकारात्मक चर्चा करून पर्यावरणाचे काम अतिशय उत्साहाने आपले सर्व मंडळ करत आहे अशी शाबासकीची थाप दिली आणि मी पर्यावरण संमेलनास उपस्थित राहील अशी ग्वाही दिली त्याबद्दल त्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांचे पर्यावरण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक व्यक्त करण्यात आले .

यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे, उपाध्यक्ष प्रकाश केदारी, सचिव डॉ. अनिल लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख महेश पाडेकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.