फुलगाव येथील मुर्ती विषय सामोपचाराने सोडवावा – दिलीप सुरवाडे ;


भुसावळ २१ जुलै प्रतिनिधी – तालुक्यातील फुलगाव येथे ओपन स्पेसवर भ.गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली आहे.या घटनेचा वि महिला ग्रामस्थांनी विरोध करत उपोषण सुरू केले आहे.
हा विषय दोन्ही बाजूंनी भावनिक झालेला असून प्रशासनाने दोन्ही बाजू ऐकून सामोपचाराने तोडगा काढावा असे मत शिवसेना उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व मा.नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी व्यक्त केले आहे.
गांवात आणि परिसरात अशा घटनांनी आपापसात दरी निर्माण न होता आधुनिक सामाजिक समतेच्या वातावरणाचा विचार करून सर्वांच्या भावनांचा सन्मान करून या समस्या सोडविल्या पाहिजेत.असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरीत बैठक आयोजित करावी अशी आग्रही मागणी सुरवाडे यांनी केली आहे.