| मुंबई –

महानगरी एक्सप्रेसच्या प्रवाशांना गुंगीचे पेय देऊन लुटणाऱ्या झारखंड गँगच्या तिघांना लोहमार्ग गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ₹1,00,494/- चा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना दादर रेल्वे स्टेशन येथे पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले.
दि. 15 जुलै 2025 रोजी रात्री 12.20 वा. CSMT स्थानकावरून सुटलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या जनरल डब्यात काही प्रवाशांना “माझा” शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून प्यायला देण्यात आले. प्रवासी बेशुद्ध अवस्थेत खंडवा रेल्वे स्थानक, मध्यप्रदेश येथे सापडले.
खंडवा GRP पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी गुन्हा वर्ग करण्यात आला होता. गुन्हा क्र. 615/2025 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 118(1), 123, 305(सी) नुसार कारवाई सुरू होती.
तीन आरोपींना अटक – झारखंडची टोळीविशेष पथकाच्या तपासानंतर खालील तिघांना अटक करण्यात आली: यात गिरीश चांदो मंडल (42 वर्षे), रा. जगाडीह, जि. देवघर, झारखंड
रुपलाल प्रभू मंडल (44 वर्षे), रा. जगाडीह, जि. देवघर, झारखंड
वासुदेव महावीर मंडल (35 वर्षे), रा. देवलबाडी, जि. जामताडा, झारखंडत्यांचे जवळ
तपासात भाड्याने घेतलेल्या टिटवाळा येथील घरातून लपवलेला चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
जप्त मुद्देमालामध्ये समाविष्ट:
विविध ब्रँडचे 9 स्मार्टफोन (Infinix, Motorola, Vivo, Tecno, Realme, POCO इ.)
2 किपॅड मोबाईल
रोख ₹2000, ओळखपत्रे (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार, पॅन)
सॅक, कपडे, BACARDI चप्पल
Lorazepam (Ativan 2mg) च्या 60 गोळ्या
इतर घरगुती वस्तू
एकूण जप्त ऐवज किंमत: ₹1,00,494/-
पूर्वगामी गुन्हेगारी इतिहास:
मुख्य आरोपी गिरीश मंडल याच्यावर झारखंडमधील मधूपूर रेल्वे पोलीस ठाण्यात
गु.क्र. 47/2016 (कलम 328, 379, 34 भा.दं.वि.)
गु.क्र. 37/2016 (कलम 328, 379, 411 भा.दं.वि.)
असे दोन गुन्हे आधीपासूनच नोंद आहेत.
कारवाईमागील विशेष पथक:
पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सहायक आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पो.नि. रोहित सावंत, सपोनि अभिजीत टेलर, श्रे.पौ.नि. सुधाकर सावंत, आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.



