भुसावळ (प्रतिनिधी ) – –
पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालयाल भुसावळ जिल्हा जळगाव येथे दि.२०ते २२ जुलै 2025 दरम्यान तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन जळगांव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मीता ताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले . सदर प्रसंगी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. आर. खंडारे . सौ ज्योती खंडारे, मिलिंद राजे, भुसावळ हायस्कूल चे उपप्राचार्य डॉ . प्रमोद शुक्ला, आंतरराष्ट्रीय कोच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, नाहाटा महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. चंद्रशेखर सरोदे, , डॉ. प्रमोद सोनवणे, अभिजीत पाटील, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

.या कार्यक्रमांच्या मुख्य अतिथी श्रीमती स्मीताताई वाघ व प्रमुख पाहुण्यांचे सर्वात प्रथम स्वागत विद्यालयातील एन. सी.सी. कॅडेट द्वारा सलामी देऊन कण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व माल्यार्पणाने करण्यात आली. अतिथीचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत विदयालयाचे प्राचार्य श्री डॉ .आर. आर खंडारे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले. तर नंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन सर्व अतिथी व उपस्थितांचे शब्द सुरांनी स्वागत केले स्वागता नंतर प्राचार्य डॉ.आर.आर. खंडारे यांनी अतिथींच्या समानार्थी प्रास्ताविक पर भाषण केले.

विभागीय स्तरावरील खो-खो खेळ स्पर्थेसाठी चार क्लस्टर (क्षेत्रीय) मध्ये पुणे, अमरावती, गांधीनगर, अहमदाबाद येथील विभागातील खेळाडूंनी परेड संचालनाद्वारे मानवंदना देत शिस्त, समन्वय, एकतेचे प्रदर्शन केले. यामध्ये पुणे रीजनने उत्कृष्ट परेड संचालन करून प्रथम क्रमांकाचा मान मिळून ट्रॉफी जिंकली.
. या स्पर्धेकरिता -एकूण २८८ खेळाडू आलेले असून प्रत्येक विभागात 18 नवोदय विद्यालयांचा समावेश असून 72 विद्यार्थी त्यात 36 मुले व 36 मुली यांचा समावेश आहे. पंच तांत्रिक समिती म्हणून जळगाव जिल्हा खोखो असोसिएशनचे. राज्य व राष्ट्रीय पंच परीक्षा पास असलेले पंच उपस्थित होते.
नंतर मशाल प्रज्वलन करून सर्व टीम लीडर द्वारा शपथविधी पार पडला. लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते शाळेच्या उत्तम निकालास पात्र असलेल्या शिक्षकांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला तर नंतर उद्घाटनपर अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण कुठल्याही पदावरजा परंतु आपण आधी भारतासाठी काम करा आपल्या कार्यात समर्पण प्रामाणिकता व कर्तव्यनिष्ठा असेल तर आपण निक्कीच पुढे जाल व आपल्या भारताचे नाव आपल्या विद्यालयाचे नाव कुटुंबाचे नाव उज्वल कराल. जळगाव जिल्हा हा खूप मोठा आहे. 15 तालुके असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असल्याने विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये येण्याची इच्छा अपुरी रहाते त्यासाठी अजून एक नवोदय विद्यालय मिळण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी आवर्जून त्याचप्रमाणे नवोदय विद्यालयाला आपल्या खासदार फंडातून जिम देण्याचे सुद्धा घोषित केले. व शांतीचे प्रतिक असलेले कबूतर व बलून आकाशात सोडून मैदानावरती फित कापून मैदान पूजन व नारळ फोडून स्पर्धेचे विधिवात उद्घाटन केले. व ते घोषित ही केले .

सतरा वर्षाखालील मुलांमध्ये आमदाबाद रिजन विरुद्ध पुणे रिजन असा सामना झाला यात पुणे संघ विजयी झाला तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विरुद्ध गांधीनगर अशी लढत होऊन पुणे संघ विजयी झाला अशा प्रकारे खेळाचे सुरुवात झाली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बलराम द्विवेदी व विद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी. यांनी केले बलराम द्विवेदी यांनी आपल्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून सर्वांना आपल्या वाणीतून व शेरोशायरीतून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सराटे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन अजय धाराणे यांनी केले.


