बाजारपेठ ते अमर स्टोअर पर्यंत रस्ता बंद ; शहर वाहतूक शाखा भुसावळच्यावतीने वाहतुकधारक व नागरिकांना सूचना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) - नगर पालिका भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन ते अमर स्टोअर पर्यंत रोड चे काँक्रीटीकरण काम बुधवार 16/07/25 पासून सुरू करणार आहे. त्यामुळे बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतूक वर परिणाम होणार असून त्या बाबत शहर वाहतूक शाखा भुसावळ तर्फे सपोनि उमेश महाले  खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. 

एस टी बस प्रवाशांसाठी – बस स्टँड -वरणगाव रोड – महामार्ग मार्गे नाहटा चौक कडून पुढील प्रवासासाठी जाणार आहेत. तसेच भुसावळ बस स्टँड येथे येणारी बस नाहटा चौक -महामार्ग – वरणगाव रोड मार्गे बस स्टँड येथे येणार आहेत.
नाहटा चौक येथे बस उपलब्ध होतील जामनेर रोड वरून रेल्वे स्टेशनकडे जाणारे प्रवासी – लोखंडी पूल – हमबर्डीकर चौक – गांधी पुतळा – रेल्वे स्टेशन चे उत्तरे कडील बाजू कडे जावे. प्लॅटफॉर्म क्रमांक स्टँड/ रेल्वे स्टेशन येथून निघणारे व जाणारे प्रवाशी रिक्षा – ( अत्यावश्यक परिस्थिती वगळता ) मॉडर्न रोड , गांधी चौकी, विठ्ठल मंदिर वार्ड, राम मंदिर वार्ड, सराफ बाजार, या भागातून रिक्षा वाहतूक करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

व्यवसायीक , दुकानदार , हातगाडी चालक यांनी रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल असे आपले सामान, जाहिरात बोर्ड रस्त्यांवर ठेवू नये. कारवाई करण्यात येईल. वरील सूचनांचे पालन करून रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षात घ्यावी. असे आवाहन
शहर वाहतूक शाखा भुसावळ प्रभारी अधिकारी यांनी रिक्षाचालक व नागरिकांना केले आहे