राजश्री कात्यायनी यांच्या अध्यक्षतेखाली इनरव्हीलने पटकावले सहा पुरस्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंगणघाट येथे नुकतीच ३५ वी जिल्हा असेंब्ली संपन्न झाली . यात सौ राजश्री कात्यायनी यांच्या अध्यक्षते खाली इंनरव्हील क्लब भुसावळ यांनी तब्बल सहा पुरस्कार पटकावले

यामध्ये ,शंकुतला मोदी पुरस्कार पी. पी. मनीषा तायडे ह्यांना प्रथम पुरस्कार डिस्ट्रिक्ट चेअरमन जयश्री फोपळे ह्यांचा हस्ते देण्यात आला.राजश्री कात्यायनी प्रेसिडेंट यांना असोसिएशन गोल तथा डिस्ट्रिक्ट साठी गोल्ड सेफ चाइल्डहुड , व बेस्ट प्रेसिडेंट करीता हेल्पिंग हॅण्ड अवॉर्ड असे तीन पुरस्कार डिस्ट्रिक्ट चेअरमन ह्यांचा हस्ते देण्यात आले तसेच सी सी अवॉर्ड आशा पाटील ,बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड प्राची राणे ह्यांना सुद्धा चेअरमन हस्ते अवॉर्ड देण्यात आले.

टीमचे एकजुटीने परिश्रम म्हणून हे यश

आपले मनोगत व्यक्त करतांना अध्यक्ष राजश्री कात्यायनी म्हणाल्या की माझ्या संपूर्ण टीम ने केलेले सहकार्य व एकजुटीने केलेल्या परिश्रमामुळे हे शक्य होऊ शकले त्या पुढे म्हणाल्या की आमच्या भुसावळ क्लब च्या डॉ रश्मी शर्मा इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेशरर आहेत ह्याचाही गौरव करण्यात आला ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे