जळगाव – अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून याप्रकरणी तरुणाला अटक केली असुन त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अजय सुभाष भिल (वय १९, रा. निपाणे, ता. पाचोरा) याने सप्टेंबर २०२४ मध्ये पळवून नेले होते. त्यांचा शोध घेत असताना पाचोरा पोलिसांनी दि. २२ मार्च रोजी त्यांना पुणे जिल्ह्यातील केडगाव येथून ताब्यात घेतले.

लग्नाचे अमिष दाखवून या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवाल्याचे तिने जयाबात सांगितले. तसेच ती गर्भवती असून अजय मिल वाहविरुद्ध पोस्कोचे वाढीव कलम लावण्यात आले. त्याला अटक करून रविवारी दि. २३ मार्च रोजी जळगाव येथे न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. रमाकांत पाटील यांनी काम पाहिले.


