भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा ;

गोजोरे, ता. भुसावळ – अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) या संस्थेच्या माध्यमातून गोजोरे ता. भुसावळ येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा करण्यात आला.

प्रयागराज येथे १४४ वर्षानंतर झालेल्या महाकुंभात जगभरातून करोडो लोकं येऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून गेले व या सर्वांनी समरसतेचा अनुभव घेतला.

या तीर्थदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता जोपासली जावी, आम्ही सर्व एकाच आईची मुलं आहोत व त्यानात्याने आम्ही एकमेकांचे बंधु आहोत हा भाव वृद्धिंगत व्हावा असा हेतू आहे.

यासाठी त्या भागातील/गावातील प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक एक जोडपे व अन्य मंडळी या सोहळ्यात सहभागी व्हावेत असा प्रयत्न आपण केला आहे.

या सोहळ्यात एकूण 12 जोडप्यांच्या हस्ते तीर्थकलशाचे पूजन मंत्रोच्चारात करण्यात आले.