मध्य रेल्वेकडून होळी भेट- उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणासाठी ६८ होळी विशेष ट्रेन; या वर्षी एकूण १८४ होळी विशेष गाड्या ;

मध्य रेल्वेने या सणासुदीच्या / होळीच्या सणासाठी उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणा येथे जाणाऱ्या प्रवाशांना होळीची एक अद्भुत भेट दिली आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांना त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत होळीचा सण साजरा करता यावा यासाठी देशभरातील विविध ठिकाणी एकूण १८४ विशेष ट्रेन चालवत आहे.
या पैकी ६८ गाड्या उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणा येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत.
या ट्रेनमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल कोचच्या मिश्र संयोजनासह ट्रेनचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणा यांसाठी ६८ रेल्वे फेऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे, ज्यामध्ये ३६ विशेष रेल्वे फेऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  • मुंबई ते मऊ १० फेऱ्या
  • मुंबई ते बनारस ६ फेऱ्या
  • मुंबई ते गोरखपुर ८ फेऱ्या
  • मुंबई ते कानपुर ४ फेऱ्या आणि
  • पुणे ते गाजीपुर शहर ८ फेऱ्या

इतर ३२ रेल्वे फेऱ्या खालीलप्रमाणे आहेत:

  • पुणे ते झांसी (मध्यप्रदेश) ४ फेऱ्या
  • हडपसर ते झाशी (मध्यप्रदेश) ४ फेऱ्या
  • पुणे ते इंदोैर (मध्यप्रदेश) ६ फेऱ्या
  • नाशिक रोड ते धनबाद (झारखंड) १० फेऱ्या
  • पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) ४ फेऱ्या आणि
  • हडपसर ते हिसार (हरियाणा) ४ फेऱ्या

या विशेष ट्रेन प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतील. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी सुविधा वाढवल्या आहेत आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्य स्थानकांवर पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालय सुविधा असलेली होल्डिंग एरिया तयार केली जात आहेत.

अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करून एक पद्धतशीर रांगेची व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. स्थानकांवर प्रमुख ठिकाणी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रवाशांची सुरक्षितता राखण्यास मदत करते. हे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या नियुक्त केलेल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यास मदत करत आहेत, सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत आणि स्थानक परिसरात गर्दीच्या हालचाली प्रभावीपणे व्यवस्थापित करत आहेत.

उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणा येथे जाणाऱ्या या विशेष ट्रेनमध्ये होळीच्या सणासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सुधारित संरचनेसह काही विशेष गाड्यांचा विस्तार समाविष्ट आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:

04152/04151 लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपुर साप्ताहिक अतिजलद विशेष
04152 विशेष ट्रेन दि. १५.०३.२०२५ ते दि. २२.०३.२०२५ पर्यंत दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल. (२ फेऱ्या)
04151 विशेष ट्रेन दि. १४.०३.२०२५ ते दि. २१.०३.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी कानपुर सेंट्रल येथून सुटेल. (२ फेऱ्या)

04152/04151 ची सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, ४ शयनयान, ८ जनरल सेकंड क्लास, २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

01923/01924 हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई-झांसी साप्ताहिक अतिजलद विशेष
01923 विशेष ट्रेन दि. १६.०३.२०२५ ते २३.०३.२०२५ पर्यंत दर रविवारी हडपसर येथून सुटेल. (२ फेऱ्या)
01924 विशेष ट्रेन दि. १५.०३.२०२५ ते २२.०३.२०२५ पर्यंत दर शनिवारी वीरांगना लक्ष्मीबाई-झांसी येथून सुटेल. (२ फेऱ्या)

01921/01922 पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई-झांसी साप्ताहिक अतिजलद विशेष
01921 विशेष ट्रेन दि. १३.०३.२०२५ ते दि. २०.०३.२०२५ पर्यंत दर गुरुवारी पुणे येथून सुटेल. (२ फेऱ्या)
01922 विशेष ट्रेन दि. १२.०३.२०२५ ते दि. १९.०३.२०२५ पर्यंत दर बुधवारी वीरांगना लक्ष्मीबाई-झांसी येथून सुटेल. (२ फेऱ्या)

01923/01924 आणि 01921/01922 ची सुधारित संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

03398/03397 नाशिक रोड-धनबाद साप्ताहिक विशेष
03398 विशेष ट्रेन दि. १३.०३.२०२५ ते दि. २७.०३.२०२५ पर्यंत दर गुरुवारी नाशिक रोड येथून सुटेल. (३ फेऱ्या)
03397 विशेष ट्रेन दि. ११.०३.२०२५ ते दि. २५.०३.२०२५ पर्यंत दर मंगळवारी धनबाद येथून सुटेल. (३ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक 03398/03397 समान संरचनेसह चालेल.

ट्रेन क्रमांक 04152/04151, 01923/01924, 01921/01922 आणि 03398/03397 विद्यमान वेळापत्रक, दिवस आणि थांब्यांनुसार चालतील.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 04152, 01923, 01921 आणि 03398 हे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह खुले आहे.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

मध्य रेल्वेने शेवटच्या वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना वेळेवर स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला देत आहे. वेळेवर पोहोचल्याने बोर्डिंग प्रक्रिया सुलभ होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी होईल.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटे आणि ओळखपत्रांसह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.