धुळे (प्रतिनिधी ) : धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षकासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने लाच प्रकरणात अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात मंगळवारी सायंकाळी हा सापळा यशस्वी करण्यात आला. निरीक्षक किशोर देशमुख व खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे. लाच प्रकरण
तक्रारदार हे मेडिकल व्यावसायीक आहेत. त्यांच्या दुकानाचे स्थळ परीक्षण करण्यासाठी आरोपी देशमुख यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली व पडताळणी अंती खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे आतापर्यंत धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई झाली नव्हती मात्र धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात एसीबीचा सापळा यशस्वी झाल्यानंतर लाचखोर पुरते हादरले आहेत.


